सशस्त्र सैन्यदलात अधिकारी होण्यासाठी मोफत पूर्व प्रशिक्षणाची सुवर्णसंधी

SSB कोर्स क्र.६७ साठी १५ ऑक्टोबरला मुलाखत

सिंधुदुर्ग:
भारतीय सैन्यदल, नौदल व वायुदलामध्ये अधिकारी पदावर भरती होण्यासाठी आवश्यक असलेल्या Services Selection Board (SSB) परीक्षेच्या पूर्वतयारीसाठी महाराष्ट्र शासनाच्या छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्र, नाशिक रोड, नाशिक येथे महाराष्ट्रातील युवक-युवतींसाठी SSB कोर्स क्र. ६७ आयोजित करण्यात आला आहे. हा प्रशिक्षण वर्ग १९ ते २८ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत होणार आहे. निवड झालेल्या प्रशिक्षणार्थींनी १८ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी १० वाजता प्रशिक्षण केंद्रात उपस्थित राहावे.
या प्रशिक्षण कालावधीत प्रशिक्षणार्थींना निःशुल्क प्रशिक्षण, निवास व भोजन उपलब्ध करून देण्यात येणार आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील इच्छुक पात्र उमेदवारांनी या संधीचा लाभ घेण्यासाठी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, सिंधुदुर्ग येथे १५ ऑक्टोबर २०२६ रोजी मुलाखतीस उपस्थित राहावे. मुलाखतीस येताना Department of Sainik Welfare, Pune यांच्या www.mahasainik.maharashtra.gov.in या संकेतस्थळावरील DSW Portal → Resources → PCTC Nashik SSB ६७ (किंवा संबंधीत जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाने प्रिंट दिलेल्या) प्रवेशपत्र व संबंधित परिशिष्टांची प्रिंट काढून ती पूर्ण भरून सोबत आणावी.
SSB प्रशिक्षण वर्गासाठी खालीलपैकी कोणतीही एक पात्रता असणे आवश्यक आहे : कंम्बाईड डिफेन्स सहींसेस एक्झामिनेशन (CDSE-UPSC) अथवा नॅशनल डिफेंस अॅकेडमी एक्झामिनेशन (NDA-UPSC) पास झालेली असावी व त्यासाठी सर्व्हिसेस सिलेक्शन बोर्ड मुलाखतीसाठी पात्र झालेले असावे. एनसीसी स्पेशल एन्ट्री साठी एस.एस.बी. मुलाखतीसाठी कॉल लेटर असावे. टेक्नीकल ग्रॅज्युएट कोर्ससाठी एस.एस.बी. मुलाखतीसाठी कॉल लेटर असावे. विद्यापीठ प्रवेश प्रणाली (University Entry Scheme) साठी एसएसबी कॉल लेटर असावे किंवा एस.एस.बी. साठी शिफारस केलेल्या यादीत नाव असावे.
प्रशिक्षण वर्गास येताना संबंधित पात्रतेचे प्रमाणपत्र व आवश्यक कागदपत्रे सोबत आणणे आवश्यक आहे. अधिक माहितीसाठी प्रभारी अधिकारी, छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्र, नाशिक रोड, नाशिक यांच्याशी training.petenashik@gmail.com, दूरध्वनी ०२५३-२४५१०३२ किंवा व्हॉट्सॲप ९१५६०७३३०६ या क्रमांकावर कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top