माणगाव हायस्कूलच्या माध्यमिक व उच्च माध्यमिक विभागाने एकाच दिवसात बांधले तीन वनराई बंधारे

माध्यमिक विभागाने हेडगेवार प्रकल्प तर उच्च माध्यमिक विभागाने नाणेली काळकादेवी पुल व फॉरेस्ट वनक्षेत्र यक्षिणी मंदिर परिसर या ठिकाणी बांधले बंधारे.

कुडाळ प्रतिनिधी:
दुष्काळावर मात करण्यासाठी आणि पाणी आडवा पाणी जिरवा हा मूलमंत्र घेऊन महाराष्ट्र शासन कृषी विभाग आणि जिल्हा परिषद सिंधुदुर्ग यांच्यावतीने माणगाव हायस्कूलला दोन वनराई बंधारे बांधण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या या सूचनेचे पालन करत आज एकाच दिवसात माणगाव वासुदेवानंद सरस्वती हायस्कूल ने तीन वनराई बंधारे बांधून जिल्ह्यात विक्रम केला आहे एकाच दिवसात तीन वनराई बंधारे बांधणाऱ्या माणगाव हायस्कूलचे सर्व स्तरातून कौतुक केले जात आहे माध्यमिक व उच्च माध्यमिक विभाग यांच्यावतीने हे बंधारे बांधण्यात आले असून माध्यमिक विभाग इयत्ता नववीच्या विद्यार्थ्यांनी हेडगेवार प्रकल्प या ठिकाणी वनराई कक्षा बंधारा बांधला असून उच्च माध्यमिक विभागातील आर्ट्स कॉमर्स व सायन्सच्या विद्यार्थिनी यांनी नाणेली काळकादेवी पुलाजवळ वनराई बंधारा बांधला असून सायन्सच्या विद्यार्थ्यांनी वन विभागाच्या माध्यमातून माणगाव यक्षिणी मंदिर परिसर या ठिकाणी वनराई बंधारा बांधला आहे.

सद्यस्थितीत पावसाचे प्रमाण कमी झाल्यामुळे तसेच दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाल्याने वनक्षेत्रातील पाण्याची उपलब्धता वाढविण्याच्या उद्देशाने वनक्षेत्रामध्ये वनराई बंधारा बांधण्यात आले. त्यामुळे वनक्षेत्रातील नैसर्गिक जलस्रोतांचे संवर्धन होऊन वन्यप्राण्यांना पिण्याच्या पाण्याची उपलब्धता होण्यास मदत होईल. तसेच जमिनीतील ओलावा टिकून राहून वृक्षसंपदा व जैवविविधतेचे संरक्षण करण्यास हातभार लागेल. सदर उपक्रम वनक्षेत्रातील पाणीटंचाई कमी करण्यासाठी तसेच वन्यजीव संवर्धन व पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी राबविण्यात आला.

यावेळी मुख्याध्यापक संजय पिळणकर सर पर्यवेक्षक सी.डी चव्हाण सर श्री आडेलकर सर कृष्णा सावंत सर श्री मलतवाडकर सर श्रीमती पाटील मॅडम श्रीमती तामानेकर मॅडम उपस्थित होते यावेळी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सचिन धुरी व उपाध्यक्ष दत्ता कोरगावकर तसेच माणगावच्या ग्रामविष्कार अधिकारी चेतना म्हाडगूत मॅडम नानेली सरपंच आरेकर मॅडम उपस्थित होत्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top