कुडाळ शहरातील अवजड वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्याचे आदेश
मुख्य बाजारपेठ व कुडाळ-मालवण मार्गावर अवजड वाहतुकीस बंदी; वाहतूक कोंडी टाळण्यासाठी जिल्हादंडाधिकाऱ्यांचा निर्णय कुडाळ:कुडाळ शहरातील वाढती वाहतूक कोंडी आणि नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने शहरातील अवजड वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला आहे. जिल्हादंडाधिकारी तथा जिल्हा रस्ता सुरक्षा समितीच्या अध्यक्ष तृप्ती धोडमिसे यांनी मोटार वाहन कायदा १९८८ मधील कलम ११५ अन्वये पुढील आदेश होईपर्यंत…
