सावंतवाडीत भरवस्तीत महिलेची सोन्याची चेन हिसकावून चोरटे पसार…
चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल; पोलिसांकडून सीसीटीव्हीची तपासणी सुरू… सावंतवाडी प्रतिनिधी: शहरातील अत्यंत गजबजलेल्या आणि भरवस्तीत असलेल्या कॉसमॉस बिल्डिंग परिसरात आज सकाळी एक धक्कादायक आणि धाडसी चोरीची घटना घडली. मोटरसायकलवरून आलेल्या दोन अज्ञात चोरट्यांनी एका ज्येष्ठ महिलेच्या गळ्यातील सोन्याची चेन हिसकावून पोबारा केला. ही घटना आज सकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास घडली असून, यामुळे सावंतवाडी शहरात एकच खळबळ…
