सिंधुदुर्ग जिल्ह्यात दुष्काळ निवारणासाठी चारा व्यवस्थापन आणि ‘विकसित भारत रोजगार व उपजीविका हमी अभियाना’साठी स्वतंत्र ‘टास्क फोर्स’
सिंधुदुर्गनगरी:सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दुष्काळसदृश परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर दुष्काळ निवारणाच्या उपाययोजनांचे नियोजन आणि प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने चारा व्यवस्थापन तसेच ‘विकसित भारत रोजगार आणि उपजीविका हमी अभियान (ग्रामीण)’ (VB-G RAM G) अंतर्गत कामांसाठी स्वतंत्र टास्क फोर्स (कृती गटांची)ची नियुक्ती केली आहे. जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या अध्यक्षा तृप्ती धोडमिसे यांनी याबाबतचे आदेश निर्गमित केले आहेत. पशुधनासाठी…
