सावंतवाडीत ‘भाजप ध्वज वाटप अभियाना’चा जल्लोषी शुभारंभ; विशाल परब यांच्या हस्ते कार्यकर्त्यांना ध्वजांचे वाटप
स्थापना दिनानिमित्त सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातील हजारो घरांवर फडकणार भाजपचा भगवा ध्वज! सावंतवाडी:भारतीय जनता पार्टीच्या स्थापना दिनाचे औचित्य साधून सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या संकल्पनेतून उद्या सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातील कार्यकर्त्यांच्या घरांवर, मंडल, बूथ आणि शक्ती केंद्र कार्यालयांवर हजारोंच्या संख्येने भारतीय जनता पार्टीचे ध्वज फडकवले जाणार आहेत. या पार्श्वभूमीवर,…
