भोसले सैनिक स्कूलची आस्था पवार मल्लखांब स्पर्धेत जिल्ह्यात अव्वल…
सावंतवाडी:सिंधुदुर्ग जिल्हास्तरीय मल्लखांब स्पर्धेत १४ वर्षांखालील गटात यशवंतराव भोसले सैनिक स्कूलच्या इयत्ता सहावीतील कॅडेट आस्था पवार हिने दमदार कामगिरी करत प्रथम क्रमांक पटकावला. या यशामुळे तिची विभागीय फेरीसाठी निवड झाली आहे. मल्लखांब या कौशल्य, ताकद, संतुलन आणि एकाग्रतेची कसोटी पाहणाऱ्या क्रीडा प्रकारात आस्थाने सातत्यपूर्ण सराव, मेहनत आणि शिस्तीच्या जोरावर आपल्या कौशल्याचे प्रभावी प्रदर्शन केले. तिच्या…
