वर्देत महाविद्यालयीन युवतीची चाकूने भोसकून हत्या.
कुडाळ:सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वर्दे येथे दामिनी किरण पालव (वय २३) या महाविद्यालयीन युवतीची चाकूने वार करून निघृण हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना शनिवारी (ता. १७) सायंकाळी घडली. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून, हत्येनंतर आरोपी फरार झाला आहे. त्याच्या शोधासाठी सिंधुदुर्ग जिल्हा पोलिसांनी सहा पथके तैनात केली होती जिल्ह्यात विविध ठिकाणी नाकाबंदी…
