१४ ते २५ सप्टेंबर दरम्यान जिल्ह्यात लेझर लाईट व बीम्स उपकरणांच्या वापरास मनाई
सिंधुदुर्गनगरी:गणेशोत्सवाच्या कालावधीत सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांकडून मिरवणुकीमध्ये मोठ्या प्रमाणात लेझर लाईटचा वापर करण्यात येण्याची शक्यता असते. लेझर लाईट डोळ्यांवर पडल्याने वृद्ध व्यक्ती, लहान मुले तसेच किशोरवयीन व्यक्तींच्या डोळ्यांना इजा होऊन दृष्टीदोष निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेता, जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ मधील कलम १६३ अन्वये जिल्ह्यात लेझर लाईट/बीम्स उपकरणांच्या सार्वजनिक…
