जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांचे पिंगुळी येथे वनराई बंधाऱ्यासाठी श्रमदान
वनराई बंधारे पुढील ७-८ महिन्यांसाठी पाणी टिकवून ठेवण्याचा कमी खर्चाचा उत्तम उपाय जिल्ह्यात ४ दिवसांत ८०० हून अधिक बंधारे सिंधुदुर्ग:मागील ३५-४० वर्षांच्या कालावधीत सिंधुदुर्ग जिल्ह्यात यंदा सर्वात निचांकी पाऊस झाला आहे. त्यामुळे भूगर्भातील पाण्याची पातळी खालावली असून, राज्य शासनाने जिल्ह्यात दुष्काळाचा ‘ट्रिगर वन’ लागू केला आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात वाहून जाणारे पाणी बंधाऱ्यातून अडवून ते…
