माणगाव जि.प.महायुतीचे उमेदवार रुपेश कानडे आणि माणगाव पंचायत समितीचे कौशल जोशी यांनी केला प्रचाराचा शुभारभ…

देवतांचे आशीर्वाद अन् जनतेच्या साथीने विजयाचा निर्धार !

कुडाळ प्रतिनिधी
तालुक्यातील माणगाव जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या रणधुमाळीला आता खऱ्या अर्थाने सुरुवात झाली आहे. माणगाव जिल्हा परिषद मतदार संघाचे महायुतीचे उमेदवार रुपेश कानडे आणि माणगाव पंचायत समितीचे उमेदवार कौशल जोशी यांनी आज माणगाव येथील ग्रामदैवत श्रीदेवी यक्षिणी व दत्त महाराज याना श्रीफळ वाढवून प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी महायुतीच्या सर्व कार्यकर्त्यांनी दोन्ही उमेदवारांना मोठ्या मताधिक्याने निवडून येण्यासाठी प्रार्थना केली.

यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत भाजपा जिल्हाप्रमुख प्रभाकर सावंत भाजपा जिल्हा सरचिटणीस रणजित देसाई तालुकाप्रमुख दीपक नारकर भाजपा तालुकाध्यक्ष संजय वेंगुर्लेकर तसेच महायुतीये अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top