जि प सदस्य रुपेश पावसकर यांचा रांगणातुळसुली येथे बाळूमामा देवस्थान कडून सत्कार…

कुडाळ
नवनिर्वाचित जिल्हा परिषद सदस्य रुपेश पावसकर यांचा रांगणातुळसुली येथील बाळूमामा देवस्थान येथे विजयी झाल्याबद्दल बाळूमामा देवस्थान कमिटी रांगणातुळसुली यांच्या वतीने सत्कार करण्यात आला. रामदास तेंडोलकर यांनी त्यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार केला। तसेच श्री.वरक व श्री.तांडेल यांच्यावतीने त्यांना मानाची घोंगडी देण्यात आली. यावेळी देवस्थान कमिटीतील पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top