मालवणमधील बिळवस जल मंदिरातील सातेरी देवीवर व्हिडिओ सॉन्ग रिलीज..

नागकन्या (आई सातेरी देवी ) च्या भूमिकेत कुडाळ येथील कु.तानिया समिल जळवी.

कुडाळ
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातील बिळवस जल मंदिर येथे व्हिडिओ चित्रीकरण केलेल्या सातेरी देवीच्या ” आई तू सातेरी माऊली ग ” या मराठी सॉन्ग गाण्याचा (गोंधळ गाणं ) बुधवार दिनांक 01.04.2026 रोजी सायंकाळी रिलीज झाल.हे गाणे जवळपास साडेसात मिनिटे पर्यंत असुन,या व्हिडीओ गाण्यामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ, मालवण, कणकवली, सावंतवाडी, वेंगुर्ला देवगड या तालुक्यातील छोट्या -मोठ्या वेगवेगळ्या कलाकारांचा समावेश आहे.या गाण्याची संपूर्ण कोरिओग्राफी कुडाळ येथील प्रसिद्ध कोरिओग्राफर आणि पी. के. डान्स चे संस्थापक श्री. प्रसाद कमतनूरे यांनी केली आहे.

या व्हिडिओ सॉन्ग मध्ये मालवण तालुक्यातील बिळवस येथील जल मंदिर दाखवण्यात आले आहे.बिळवस येथील सातेरी देवीची प्रचिती कशी आहे हे, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील स्थानिक कलाकारांच्या कलेच्या माध्यमातून चित्रीकरण करून थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न केला आहे.

..एक आजी बिळवस गावात असलेल्या सातेरी जलमंदिरात गावातील वार्षिक उत्सवानिमित्त रात्रीच्या वेळी आपल्या घरातून सातेरी मंदिरात जाण्यासाठी काठी टेकत… काठी टेकत.. बाहेर पडते आणि ती… आजी.. चालत असताना अंधार पडल्याने ती, आपली वाट चुकते…त्याच वेळी त्या चुकलेल्या..आजीला एक छोटी मुलगी त्या आजीच्या हाताला घट्ट पकडते आणि त्या चुकलेल्या आजीचा हात धरून आजीला त्या सातेरी जल मंदिरात घेऊन येते.आजी मंदिरात आल्यानंतर ती छोटी मुलगी आजीला दिसत नाही ती, मुलगी अचानक गायब होते…त्यावेळी त्या आजीला प्रश्न पडतो मला हात धरून मंदिरात घेऊन आलेली ती मुलगी कुठे दिसत नाही… त्यावेळी त्या आजीला समजते की, हीच ती “सातेरी देवी ” जी मला चुकलेली वाट दाखवत.. दाखवत.. माझा हात धरुन सातेरी मंदिरात मला घेऊन आली असावी असे त्या आजीला वाटते.

यामध्ये काम केलेले सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कलाकार पुढीप्रमाणे आहेत…Story स्टोरी- नागकन्या (आई सातेरी देवी ) च्या भूमिकेत कुडाळ येथील कु. तानिया समिल जळवी तर, त्यातील आजीच्या भूमिकेत आशालता लवू तोंडवळकर वेर्ली, मालवण.

Artist (आर्टिस्ट ) श्री. अमोल सावंत, असगणी मालवण, श्री. गणेश कुंभार, तळवडे-सावंतवाडी, कु. चैताली श्रीराम पालव, बिळवस – मालवण, कु. हर्षाली दीपक पालव,बिळवस – मालवण.

Dancers डान्सर… कु. सुमन रमेश चव्हाण, कुडाळ. कु. क्रांती लक्ष्मण पालव,बिळवस – मालवण. कु. हर्षदा दीपक पालव,बिळवस – मालवण.कु. श्रीईन औयुब खान, कणकवली. कु. दुर्वा विनोद चव्हाण कणकवली.

Background Dancers डान्सर… लक्ष्मण पद्माकर पालव,बिळवस – मालवण.श्रीराम गावडे, साळेल, मालवण. राज प्रदीप चव्हाण, माळगाव मालवण. विराज कदम, किंजवडे, देवगड.

Background Actors कु. केतकी संतोष पालव, बिळवस – मालवण.कु. नेहा आंनद पालव,बिळवस – मालवण.कु. अमृता आनंद पालव,बिळवस – मालवण.कु. हर्ष आनंद पालव,बिळवस – मालवण.कु. मानसी लक्ष्मण पालव,बिळवस – मालवण.उर्मिला लक्ष्मण पालव,बिळवस – मालवण.आर्या लक्ष्मण पालव,बिळवस – मालवण.गौरव लक्ष्मण पालव,बिळवस – मालवण.रिया श्रीराम पालव,बिळवस – मालवण.शाफिना औयुब खान,कणकवली.अश्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विविधतेने नटलेल्या कलाकारांनी काही महिन्यापूर्वी शूटिंग मध्ये सहभाग घेऊन केलेल्या या मराठी व्हिडिओ (सॉन्ग) सर्व ठिकाणी रिलीज झाले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top