महेंद्रा अकॅडमीच्या माध्यमातून आयोजन..
सावंतवाडी
आगामी काळात होणाऱ्या पोलीस व आर्मी भरतीच्या पार्श्वभूमीवर ६ ते १० एप्रिल या काळात सावंतवाडी येथील महेंद्रा अकॅडमीच्या माध्यमातून मोफत भरती मार्गदर्शन शिबिर आयोजित करण्यात आले आहे.
यावेळी तज्ञ प्रशिक्षकांच्या माध्यमातून ग्राउंड प्रॅक्टिस लेक्चर घेण्यात येणार आहे. त्यामुळे भरती होण्यासाठी इच्छुक असलेल्या जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी या मार्गदर्शन शिबिरात सहभागी व्हावे, शिबिरासाठी नावनोंदणी अनिवार्य राहील,असे आवाहन महेंद्रा अकॅडमीच्या माध्यमातून करण्यात आले आहे.अधिक माहितीसाठी 90226 86944 या नंबरवर संपर्क साधावा, असे आवाहन महेंद्र पेडणेकर यांनी केले आहे.
