एकमुखी दत्तमंदिर व श्री वासुदेवानंद सरस्वती पादुका मंदिर कलशारोहण सोहळ्याला कलश मिरवणुकीने सुरुवात…

सावंतवाडी :
सावंतवाडी शहरातील सबनिसवाडा येथे श्री टेंबे स्वामींनी स्थापन केलेल्या एकमुखी दत्त मंदिर व पादुका मंदिरच्या भव्य सभा मंडपाचे काम पूर्णत्वास गेले असून या दोन्ही मंदिरांच्या कलशारोहण सोहळा दिनांक ३१ मार्च ते ०२ एप्रिल असा तीन दिवस चालणार आहे या सोहळ्याची सुरुवात सोमवार दिनांक ३० मार्च रोजी सायंकाळी दत्त मंदिर पासून बाजारपेठ मार्गे पुन्हा दत्त मंदिर अशी संपूर्ण शहरातून कलशारोहण सोहळ्यासाठी आणलेल्या सुवर्णजडीत कलशांची मिरवणूक काढण्यात आली. ढोल ताशांच्या गजरात निघालेल्या या मिरवणुकीत शहरातील जवळपास ४०० ते ५०० युवक, युवती, महिला व पुरुषांनी सहभाग घेतला होता. महिलांनी भगव्या रंगाच्या साड्या व फेटे परिधान केले तर पुरुषांनी भगव्या रंगाचे सदरे, फेटे घालून सदरच्या मिरवणुकीत रंगत आणली. सबनिसवाडा येथील ढोल पथकाने अतिशय सुरेख अशा पारंपारिक वाद्याच्या तालावर मिरवणुकीचे संचालन मिरवणुकीत रंगत आणली. यावेळी फुलांनी सजवलेल्या गाडीतून मंदिरावर बसविण्यात येणाऱ्या दोन्ही कलशाची “दिगंबरा .. दिगंबराचा… जयघोष करत संपूर्ण शहरातून मिरवणूक काढण्यात आली. याप्रसंगी श्री दत्त मंदिर व वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी मंदिरच्या कार्यकारिणीचे अध्यक्ष निवृत्त पोलीस उपअधीक्षक दयानंद गवस, सचिव बाबू कुडतरकर, खजिनदार सुधीर धुमे, सदस्य दीपक पटेकर, जितू पंडित, अशोक नाईक, संतोष तळवणेकर, मीरा सिंग, विली गोवेकर, विशाल भगत, घोगळे, संदीप सावंत, विलास सावंत, सुधीर पराडकर, सौ. तुळसुळकर, विनायक पराडकर, अॅड.पी.डी. देसाई यांच्यासह स्वामींच्या शेकडो भक्तगणांनी सहभाग घेतला होता. ढोल ताशांच्या गजरात अतिशय शिस्तबद्ध निघालेल्या या मिरवणुकीमुळे कलशारोहण सोहळ्याच्या भव्यत्वाची प्रचिती आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top