सावंतवाडी प्रतिनिधी
फरशा वाहतूक करणाऱ्या ट्रकने दुचाकीला धडक
दिल्याने झालेल्या अपघातात दहा वर्षाची चिमुकली जागीच ठार झाली. निकिता प्रसाद राऊत (वय १०) असे तीचे नाव आहे. तर तिची आई चैताली गंभीर जखमी झाली. ही घटना आज ११ वाजण्याच्या सुमारास आंबोली घाटात यु आकाराच्या वळणाच्या परिसरात घडली. अपघातानंतर पळून जाण्याच्या प्रयत्नात असलेल्या ट्रक आंबोली घाटात पलटी झाल्यामुळे तब्बल अडीच तासाहून अधिक काळ वाहतूक ठप्प झाली होती. अपघातानंतर ग्रामस्थांनी आक्रमक भूमिका घेतली असून संबंधित चालकाला आमच्या ताब्यात द्या, अशी आक्रमक मागणी केली आहे. त्यानंतर कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून त्या दोघांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
