भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी दिल्या प्रमोद जठार यांना शुभेच्छा

युवा नेते विशाल परब यांची विशेष उपस्थिती…

सावंतवाडी:
भारतीय जनता पक्षाचे जेष्ठ नेते प्रमोद जठार यांची विधानपरिषद आमदारपदी निवड होत आहे. या पार्श्वभूमीवर भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी त्यांचे अभिनंदन करत त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. याप्रसंगी भाजप युवा नेते विशाल परब ,बबलू सावंत प्रामुख्याने उपस्थित होते.
प्रमोद जठार यांच्या या निवडीमुळे कोकणाला एक अभ्यासू आमदार लाभत असून, या निर्णयामुळे सर्वसामान्य जनतेत आनंदाचे वातावरण पसरले आहे, अशी प्रतिक्रिया युवा नेते विशाल परब यांनी व्यक्त केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top