INS गुलदार आज सायंकाळ पर्यंत समुद्र तळाशी स्थापित होणार…

अफवांवर विश्वास ठेऊ नका; महाराष्ट्र पर्यटन महामंडळाचे आवाहन…

सिंधुदुर्ग:
कोकणच्या पर्यटन विकासात मैलाचा दगड ठरणारा भारतीय नौदलातील निवृत्त युद्धनौका आयएनएस गुलदार निवतीच्या समुद्र तळाशी स्थापित करण्याचा महत्वपूर्ण उपक्रम महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने हाती घेतला आहे. मात्र काही जणांकडून सोशल मीडियावर वेगवेगळ्या अफ़वा पसरवल्या जात असून महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने या अफ़वांचे खंडन केले आहे.एक्स आयएनएस गुलदार प्रकल्प कामकाज नियुक्त तांत्रिक व्यवस्थापनकडून व्यवस्थित सुरु आहे. लोकांनी कोणत्याही अफ़वावर विश्वास ठेऊ नये. आज सायंकाळ पर्यंत नौका समुद्र तळाशी स्थापित होईल असे तांत्रिक टीम यांचे मार्फत सांगण्यात येत आहे. सदरचा टप्पा पूर्ण होताच सर्वाना हा टप्पा पूर्ण झालेबाबत अवगत करण्यात येईल, असे दिपक माने, प्रादेशिक व्यवस्थापक MTDC कोकण विभाग यांनी प्रसिद्धी पत्राद्वारे कळवले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top