भाजप युवा नेते विशाल परब यांचा ‘मदतीचा हात’..!
सावंतवाडी:
डोक्यावर छप्पर नाही, घरात कमावता माणूस नाही, सोबतीला फक्त मरणयातना आणि अंगावर येणारा पावसाळा… अशा अत्यंत विदारक आणि ह्रुदय पिळवटून टाकणाऱ्या परिस्थितीत इन्सुली पागावाडी येथील एक ६५ वर्षांची वृद्ध विधवा माता आणि तिचा गंभीर आजारी मुलगा मृत्यूच्या छायेत जगत आहेत. मात्र, या हतबल कुटुंबाच्या आयुष्यातील अंधार दूर करण्यासाठी ‘गरीबांचा नाथ’ म्हणून ओळखले जाणारे भाजपचे युवा नेतृत्व विशाल परब हे देवदूतासारखे धावून आले आहेत.
…तर यंदा घर पडेल अंगावर!
इन्सुली पागावाडी येथील श्रीमती जनाबाई धोंडू पाटील (वय ६५) या वृद्ध विधवा महिला आपल्या मुलासह अत्यंत मोडकळीस आलेल्या घरात राहत आहेत. घराचे छप्पर पूर्णपणे उडून गेले असून, भिंतींना मोठ्या भेगा गेल्या आहेत. १५-२० दिवसांपूर्वीच या घराचा एक मोठा भाग कोसळला होता. “यंदाचा पावसाळा अंगावर कसा काढायचा? घर अंगावर पडून आम्ही जिवंत गाडले जाऊ का?” या भीतीने या माऊलीच्या डोळ्यातले अश्रू सुकत नव्हते.यात गरिबीत आजारपणाचे मरण..!जनाबाईंचा मुलगा शाहू धोंडी पाटील हा घराचा एकमेव आधार. पण नियतीने त्याच्यावरही घाला घातला आहे. शाहू हा अत्यंत गंभीर अशा टी.बी. (क्षयरोग) च्या आजाराने ग्रस्त आहे. अंगात त्राण नाही, उपचारासाठी पैसे नाहीत आणि राहायला सुरक्षित घर नाही, अशा दुहेरी संकटात हे कुटुंब संपूर्णपणे कोलमडून गेले होते.
नितीन राऊळ यांनी दाखवली संवेदनशीलता,भाजप युवा नेते विशाल परब धावले मदतीला!
या कुटुंबाची ही भयानक परिस्थिती इन्सुली जिल्हा परिषद सदस्य नितीन राऊळ यांच्या निदर्शनास आली. त्यांनी वेळ न घालवता तातडीने या परिस्थितीची संपूर्ण माहिती भाजपचे युवा नेते विशाल परब यांच्यापर्यंत पोहोचवली. माहिती मिळताच, संवेदनशील मनाच्या विशाल परब यांनी क्षणाचाही विलंब न लावता या कुटुंबाला तात्काळ मदत देण्याचा निर्णय घेतला आणि ते या गरिबांच्या मदतीला धावून आले.
”गोरगरिबांच्या डोळ्यातील अश्रू पुसणे हेच आमचे कर्तव्य!”- विशाल परब भाजप युवा नेते
“पागावाडीतील या कुटुंबाची अवस्था पाहून मन सुन्न झाले.पावसाळ्यात एका वृद्ध माऊलीला आणि आजारी भावाला अशा परिस्थितीत सोडणे माणुसकीला धरून नाही. या कुटुंबाला सुरक्षित छत मिळवून देण्यासाठी आणि त्यांच्या उपचारासाठी आम्ही सर्वतोपरी मदत करत आहोत आणि पुढेही कटिबद्ध राहू.” असे विशाल परब (भाजप युवा नेते) यांच मत आहे.
’भाजपच युवा नेतृत्व विशाल परब’ मनाचा राजा: गरिबांचा खरा नाथ!
भाजपचे युवा नेते विशाल परब यांनी केवळ आश्वासन न देता प्रत्यक्ष कृतीतून या कुटुंबाला मायेचा आधार दिला आहे. त्यांच्या या तत्पर आणि कौतुकास्पद मदतीमुळे इन्सुली परिसरातातून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत असून, “गरिबांचा खरा नाथ विशाल परब” अशी भावना स्थानिक नागरिक व्यक्त करत आहेत. विशाल परब यांच्या या ‘मदतीचा हात’ उपक्रमामुळे आता त्या वृद्ध माऊलीच्या डोळ्यातील भीतीचे अश्रू पुसले जाऊन तिथे समाधानाचे भाव पाहायला मिळत आहेत.या कुटुंबाची परिस्थिती खरोखरच अत्यंत ह्रुदयद्रावक आहे. पावसाळा तोंडावर असताना अशा हलाखीत जगणाऱ्या माऊलीला आणि तिच्या आजारी मुलाला भाजपचे युवा नेते विशाल परब यांच्या माध्यमातून मदतीचा हात मिळणे, ही माणुसकीची साक्ष आहे.
