सावंतवाडी:
माडखोल-धवडकी येथील रूना हॉटेलजवळ आज दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास डंपर आणि ह्युंडाई वेर्णा चारचाकी गाडीत भीषण अपघात झाला. या अपघातात गाडीतील तिघे जण जखमी झाले असून, त्यांना अधिक उपचारासाठी तातडीने सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
बेळगावहून वेंगुर्ल्याच्या दिशेने जाणारी चारचाकी कार माडखोल येथे समोरून येणाऱ्या डंपरला जोरदार धडकली. हा अपघात इतका भीषण होता की यात चारचाकी गाडीचे प्रचंड नुकसान झाले आहे. अपघातानंतर स्थानिक नागरिकांच्या मदतीने जखमींना रुग्णालयात हलवण्यात आले. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत अपघाताचा पंचनामा सुरू केला आहे.
