जिल्ह्यात काळ्या काचा असलेल्या चारचाकी वाहनांचा सुळसुळाट,मात्र कारवाईचा अभाव

आरटीओ विभागाचे दुर्लक्ष,सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाची पायमल्ली

सिंधुदुर्ग प्रतिनिधी:
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील
तालुक्यात तसेच शहरांमध्ये सध्या काळ्या काचा असलेल्या चार चाकी वाहनांची संख्या वाढत असल्याचे चित्र दिसून येत आहे शहरासह ग्रामीण भागातील रस्त्यावर अनेक वाहने काळ्या फिल्म लावलेल्या अथवा अतिगडत काचा असलेल्या अवस्थेत सर्रास फिरताना आढळत आहेत यामुळे सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाची पायमल्ली होत असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे.
अनेक वाहन चालक नियम धाब्यावर बसून काळ्या काचा असलेल्या वाहनांचा वापर करत असल्याचे दिसून येते अशा वाहनांवर कारवाई करण्याची जबाबदारी असलेल्या आरटीओ विभाग प्रशासनाकडून प्रवाही कारवाई होत नसल्याची चर्चा नागरिकांमध्ये आहे

अशा काळ्या काचा असलेल्या वाहनांमुळे गुन्हेगारी कृत्यांना मदत होण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी आरटीओ विभागाने अधिक सतर्क होण्याचे गरज व्यक्त केली जात आहे.

मात्र जिल्ह्यातील अनेक रस्त्यावर
काळ्या काचा असलेली वाहने बिनधास्तपणे फिरताना दिसत आहेत. त्यामुळे नियमांचे पालन होत आहे का असा प्रश्न उपस्थित होत आहे यासंदर्भात आरटीओ विभागाने संयुक्त विशेष मोहीम हाती घेऊन नियमाचे उल्लंघन करणाऱ्या वाहनांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी नागरिकांकडून होत आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top