हिंदळे येथिल पाच महीन्याच्या अर्भकाचे शासकीय मेडिकल काँलेज,सिंधुदूर्ग येथे देहदान

सिंधुदुर्ग:
जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांच्या प्रेरणेने दि.१७ जुन २०२६ रोजी पाच महीन्याच्या अर्भकाचे शासकीय मेडीकल काँलेज सिंधुदूर्ग येथे देहदान करण्यात आले.हिंदळे ,ता.देवगड येथिल श्री.गजानन गणपत राणे व त्यांची पत्नी सौ.गायत्री गजानन राणे यांचा पाच महीन्याचा अर्भक ज्याला शारीरीक व्यंग असल्याने डाँक्टरांच्या सल्यानुसार गर्भपात करणे गरजेचे होते.आणि हे ज्यावेळी सदर दापत्यांच्या लक्षात आल्याने त्यांनी अर्भकाचे देहदान करण्याचे ठरविले.आणि दि.१७ जुन २०२६ रोजी सदर अर्भक मेडिकल काँलेजला सुपुर्द केला.याबाबत राणे दापंत्यांने घेतलेल्या निर्णयाचे सर्वच स्थरातुन कौतुक करण्यात येत आहे.
आजपर्यंत जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांच्या प्रेरणेने २१४ मरणोत्तर देहदान व १८२ अवयव दान करण्यात आलेले आहे.
देहदान प्रक्रियेच्या वेळी वैद्यकीय महाविद्यालयाचचे प्रमुख डाँ.दवंगे,जिल्हा शल्य चिकीत्सक डाँ.श्रीपाद पाटील,शरीरशास्र विभाग प्रमुख प्राजक्ता थेटे,नेत्र शल्य चिकीत्सक डाँ.बाळासाहेब जोशी,नेत्र चिकीत्सा अधिकारी डाँ.कौस्तुभ देशपांडे,नेत्रदान समुपदेशक सिद्धार्थ कांबळे आणि कर्मचारी गोसावी आदी संबंधित अधिकारी ऊपस्थित होते.
याप्रसंगी रामानंद सांप्रदाय सिंधुदूर्ग पदाधिकारी,व जगद्गुरु रामानंचार्य नरेंद्राचार्यजी यांंचे भक्तगण मोठ्या संख्येने ऊपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top