कुडाळ प्रतिनिधी:
कुडाळ शहरातील सौ. तन्वी सिद्धिविनायक कुडाळकर वय वर्षे ३६ या महिलेने आपल्या राहत्या घरी गणेश नगर कुडाळ येथे बेडरूम मधील सिलिंग फॅनला ओढणीच्या सहाय्याने गळा बांधून पंख्याला घळफास घेत आत्महत्या केली असल्याची तक्रार श्री. संजय विष्णू कुडाळकर वय वर्षे ५१ गणेश नगर कुडाळ, यांनी कुडाळ पोलीस ठाण्यात केली आहे. सौ. तन्वी कुडाळकर हिला दोन मुलगे, पती श्री. सिद्धिविनायक कुडाळकर, एक दीर, भावजई असा परिवार आहे. सौ. तन्वी हिने आत्महत्या केल्याची समजताच गणेशनगर सह कुडाळ शहरात नागरिकांकडुन हळवळ वेक्त केला जात आहे.
