विशाल परब यांच्याकडून वाढदिवसानिमित्त सेवाभावाची अनोखी भेट!

वेंगुर्ला :
पंतप्रधान श्री. नरेंद्रजी मोदी साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त राबविण्यात येणाऱ्या ‘सेवा संकल्प अभियान–२०२६’ अंतर्गत, भाजपा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष मा. श्री. रवींद्रजी चव्हाण साहेब तसेच पालकमंत्री मा. श्री. नितेशजी राणे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपा युवा नेते मा. श्री. विशाल प्रभाकर परब यांच्या वाढदिवसानिमित्त दिव्यांग बांधवांसाठी ‘देवदर्शन आनंद यात्रे’चे आयोजन करण्यात आले आहे.

आज भाजपा सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष श्री. प्रभाकर सावंत , जिल्हा उपाध्यक्ष प्रसन्ना उर्फ बाळू देसाई ,
भाजपा जेष्ठ नेते राजु राऊळ , वेंगुर्ले उपनगराध्यक्ष सुहास गवंडळकर ,देवगड प्रभारी दिक्षा तेली , सावंतवाडी प्रभारी सविता गावडे , सावंतवाडी अध्यक्ष बाबुराव गावडे , मालवण प्रभारी रंजना इंदुलकर , वेंगुर्ले प्रभारी सुनील कांबळी , क्रीडा प्रभारी प्रशांत कदम , शासकीय योजना प्रभारी विजय कदम , कणकवली प्रभारी प्रकाश सावंत , कणकवली तालुका अध्यक्ष राजेंद्र मेस्त्री, ऑफिस टीम मधून साईप्रसाद भोई, मुकुंद तोरसकर, वृषभ तोरसकर
भाजपा दिव्यांचा विकास आघाडीचे जिल्हा संयोजक अनिल शिंगाडे , सह संयोजक शामसुंदर लोक , सह संयोजक सुनील तांबे , सह संयोजक प्रकाश वाघ ,

यांच्या प्रमुख उपस्थितीत या आनंद यात्रेचा शुभारंभ झाला. दिव्यांग बंधू-भगिनींच्या चेहऱ्यावर आनंद फुलविणारी ही यात्रा त्यांच्या श्रद्धेला आणि सेवाभावाला समर्पित आहे.

सर्व सहभागी दिव्यांग बांधवांची ही देवदर्शन यात्रा सुखकर, आनंददायी आणि मंगलमय होवो, हीच मनःपूर्वक सदिच्छा!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top