युवा नेते विशाल परब यांच्या वाढदिवसानिमित्त तळवडे येथे आयोजित महाआरोग्य शिबिराला नागरिकांचा उस्फुर्त प्रतिसाद!

भाजपा सिंधुदुर्ग व मराठा ऐक्यवर्धक मंडळाचे आयोजन

सावंतवाडी:
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि महाराष्ट्र भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त पालकमंत्री नितेश राणे यांच्या मार्गदर्शनाने सप्टेंबर महिन्यात सेवा अभियान राबविण्यात आले. त्याच उपक्रमशीलतेचा पुढील टप्पा म्हणून विशाल परब यांच्या वाढदिवसानिमित्त महाआरोग्य शिबिरे आणि लोक सहभागातून कच्चे बंधारे उभारण्याचा संकल्प प्रत्यक्ष साकार करण्यात येत आहे.
वाढदिवस म्हटला की शुभेच्छांचा वर्षाव, सत्कार, बुके आणि पोस्टरची झगमगाटी सजावट… मात्र या पारंपरिक चौकटीला छेद देत ‘ना बुके, ना पोस्टर; बळीराजाच्या सक्षमीकरणासाठी योगदान!’ असा संदेश देत भाजपा युवा नेते विशाल परब यांच्या वाढदिवसानिमित्त सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात आरोग्यसेवा आणि जलसंधारणाला प्राधान्य देणाऱ्या विविध समाजोपयोगी उपक्रमांचे नियोजन करण्यात आले आहे.

आरोग्यसेवेचा ‘महासंकल्प’- तळवडे येथील महाआरोग्य शिबिराला नागरिकांचा तुफान प्रतिसाद –
जलसंधारणाबरोबरच ग्रामीण आणि दुर्गम भागातील नागरिकांना आरोग्य तपासणी व वैद्यकीय मार्गदर्शन उपलब्ध करून देण्यासाठी विविध जिल्हा परिषद मतदारसंघांत महाआरोग्य शिबिरे आयोजित करण्याचे नियोजन करण्यात आले आहेत. आज तळवडे येथील महाआरोग्य शिबिराचे उद्घाटन सावंतवाडीचे उपनगराध्यक्ष ॲड. अनिल निरवडेकर यांच्या हस्ते करण्यात आले. मराठा समाज ऐक्यवर्धक मंडळ, तळवडे यांच्या वतीने शिबिर संपन्न झाले असून तळवडे जिल्हा परिषद मतदारसंघातील नागरिकांना त्याचा लाभ घेतला.

‘वाढदिवस’ नाही, तर ‘सेवेचा उत्सव’!

वाढदिवसाच्या निमित्ताने होणारा अनावश्यक खर्च टाळून त्याच माध्यमातून समाजातील गरजू घटकांसाठी काहीतरी विधायक काम उभे करण्याचा संदेश या उपक्रमातून देण्यात आला आहे. ‘बुकेऐवजी बंधारा आणि पोस्टरऐवजी आरोग्यसेवा’ या संकल्पनेतून शेतकरी, कष्टकरी आणि सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांना केंद्रस्थानी ठेवण्याचा युवा नेते विशाल परब यांच्या उपक्रमाला समाजातून उदंड प्रतिसाद मिळत आहे.

या शिबिराच्या उद्घाटन सोहळ्यावेळी व्यासपीठावर ॲड. अनिल निरवडेकर, युवा नेते विशाल परब, माजी पंचायत समिती सभापती पंकज पेडणेकर, निरवडे माजी सरपंच हरी वारंग, बाळा तळकर, सामाजिक कार्यकर्ते नारायण उर्फ बाळा जाधव, आप्पा परब, सुहास, पिकुळकर, अण्णा मालवणकर, लवू परब, शाम कुंभार, विकास गावडे, नम्रता गावडे, मंगलदास पेडणेकर, स्मिता परब, प्रवीण लोके, सुशांत गावडे, ग्राम विकास अधिकारी सद्गुरू गावडे, शंकर सावंत बाळा भगत, शाम शेटकर यांसह अन्य मान्यवर उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top