सावंतवाडीच्या ऐतिहासिक गंजिफा कलेला मिळणार नवसंजीवनी; बांदेकर कला महाविद्यालयात आकाशकंदील महोत्सवाचा उत्साहात शुभारंभ
नगराध्यक्ष श्रद्धा भोसले यांचा पुढाकार; विद्यार्थ्यांना मिळणार पारंपरिक गंजिफा चित्रशैलीचे विशेष प्रशिक्षण सावंतवाडी:पारंपरिक कला आणि सांस्कृतिक वारशाला उजाळा देणाऱ्या आकाशकंदील महोत्सवाचे बी. एस. बांदेकर कला महाविद्यालयात उत्साहात उद्घाटन करण्यात आले. सावंतवाडीच्या ऐतिहासिक गंजिफा चित्रशैलीचा समृद्ध वारसा नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने यानिमित्त विशेष प्रशिक्षण वर्गाचे आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमासाठी नगराध्यक्ष श्रद्धा भोसले यांनी पुढाकार…
