धोकादायक विद्युत खांबाकडे मंदार शिरसाट यांनी वेधले लक्ष…

सार्वजनिक बांधकाम व महावितरणला निवेदन सादर… कुडाळ,ता.२०:कुडाळ शहरात हॉटेल आरएसएन ते संत राऊळ महाराज चौक रस्त्यावरिल काँक्रिटीकरणाचे काम पूर्ण झाल्यानंतर विद्युत खांब तसेच ठेवण्यात आले आहेत याकडे कुडाळ नगर पंचायतचे आरोग्य सभापती मंदार शिरसाट यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे आणि महावितरण विभागाचे लक्ष वेधले आहे. हे विद्युत खांब लवकरत लवकर हटविण्याची मागणी त्यांनी याद्वारे केली आहे.

Read More
Back To Top