महसूल विभाग हा शासन आणि जनतेमधील विश्वासाचा मजबूत दुवा
पालकमंत्री नितेश राणे:महसूल दिनानिमित्त उत्कृष्ट अधिकारी-कर्मचाऱ्यांचा गौरव सिंधुदुर्गनगरी:महसूल विभाग हा शासन आणि जनता यांच्यामधील अत्यंत महत्त्वाचा दुवा आहे. जन्म दाखल्यापासून ते शेतजमिनीच्या नोंदीपर्यंत सामान्य नागरिकांच्या जीवनाशी महसूल विभागाचा थेट संबंध येतो. त्यामुळे या विभागाने केवळ प्रशासकीय जबाबदारी न पार पाडता जिल्ह्याच्या विकासात सक्रिय योगदान द्यावे, असे प्रतिपादन राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे…
