माणगाव-नांनेली भागातील गुणवंत शिष्यवृत्तीधारकांचा घरी जाऊन विशेष सत्कार..!
माणगाव प्रतिनिधी:“आजचा विद्यार्थी म्हणजे उद्याच्या उज्ज्वल समाजाची ताकद!” या भावनेतून माणगाव–नांनेली भागातील शिष्यवृत्ती परीक्षेत घवघवीत यश संपादन करणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचा विशेष गुणगौरव करण्यात आला. शिवसेना-युवासेना आणि पंचायत समिती सदस्य श्री. योगेश धुरी यांच्या संयुक्त विद्यमाने थेट विद्यार्थ्यांच्या घरी जाऊन हा सत्कार सोहळा पार पडला.यावर्षीच्या शिष्यवृत्ती परीक्षेत अर्जुन सूर्यकांत धुरी याने संपूर्ण जिल्ह्यात ८ वा क्रमांक…
