ग्रामपंचायत वेत्ये येथे श्रमदानातून वनराई बंधारे; एकाच रात्रीत विहिरींच्या पाणीपातळीत वाढ
जिल्हाधिकारी, जिल्हा परिषद अध्यक्ष यांचे वेत्ये येथे श्रमदान सिंधुदुर्ग:सर्वात जास्त पाऊस पडणाऱ्या मात्र यंदा दुष्काळी परिस्थितीचा सामना करणाऱ्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात जलसंवर्धनाची एक प्रभावी चळवळ उभी राहिली आहे. सावंतवाडी तालुक्यातील ग्रामपंचायत वेत्ये येथे लोकसहभागातून वनराई बंधारे बांधण्यात आले असून, या उपक्रमामुळे अवघ्या काही दिवसांतच परिसरातील विहिरींच्या पाणीपातळीत वाढ झाल्याचे दिसून आले आहे. या श्रमदान मोहिमेत शालेय…
