सकल मराठा समाज सिंधुदुर्गतर्फे दहावी-बारावीतील यशस्वी विद्यार्थ्यांचा १३ जून रोजी सत्कार सोहळा
सावंतवाडी प्रतिनिधी:सकल मराठा समाज सिंधुदुर्गच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही दहावी व बारावीच्या परीक्षेत उज्ज्वल यश संपादन करणाऱ्या मराठा समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा भव्य सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम शनिवार, दि. १३ जून रोजी सायंकाळी ४ वाजता मांगिरीश बॅन्क्वेट हॉल, राजवाड्याच्या पाठीमागे, आरेकर खानावळीच्या बाजूला येथे संपन्न होणार आहे.या कार्यक्रमास कुडाळ-मालवण मतदारसंघाचे आमदार निलेश राणे,…
