ग्रामीण भागातील शेवटच्या घटकापर्यंत विकास पोहोचवण्यासाठी राज्य शासन कटीबद्ध : मंत्री नितेश राणे
१४.६५ कोटींच्या सावंतवाडी पंचायत समिती नूतन इमारतीचे थाटात भूमिपूजन सिंधुदुर्ग:राज्य शासन ग्रामीण भागातील शेवटच्या घटकापर्यंत विकास पोहोचवण्यासाठी कटिबद्ध असून, त्यासाठी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची यंत्रणा अधिक सक्षम केली जात आहे. याचाच एक भाग म्हणून सावंतवाडी पंचायत समितीच्या नूतन इमारतीसाठी तब्बल १४.६५ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. या इमारतीचे काम उर्वरीत २३ महिन्यांत…
सीए फाऊंडेशन परीक्षेत दत्तराज पै यांची उल्लेखनीय यश संपादन
सावंतवाडी:शैक्षणिक क्षेत्रात आपल्या बुद्धिमत्तेची, जिद्दीची आणि मेहनतीची चमक दाखवणाऱ्या सावंतवाडीच्या दत्तराज पै यांनी आणखी एक उल्लेखनीय यश संपादन केले आहे. सप्टेंबर २०२६ मध्ये घेण्यात आलेल्या चार्टर्ड अकाऊंटंट (CA) फाऊंडेशन परीक्षेत त्यांनी पहिल्याच प्रयत्नात उत्तम गुणांसह यश मिळवत आपल्या शैक्षणिक गुणवत्तेचा ठसा उमटवला आहे. दत्तराज यांच्या या यशामुळे त्यांच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला…
“स्थानिक कलागुणांना प्रोत्साहन देत पर्यावरणपूरक सणांची परंपरा जपूया”- भाजप युवा नेते विशाल परब
तळवणेत खुली सोलो नृत्य व पर्यावरणपूरक आकाशकंदील स्पर्धा उत्साहात संपन्न सावंतवाडी:आपल्या गावातील कलागुणांना व्यासपीठ देणारे उपक्रम सांस्कृतिक परंपरेला बळ देतात. नृत्यस्पर्धेतून कलाकारांना प्रोत्साहन देतानाच पर्यावरणपूरक आकाशकंदील स्पर्धेसारख्या उपक्रमांतून निसर्गसंवर्धनाचा संदेशही पुढे नेला पाहिजे,” असे प्रतिपादन भाजपा महाराष्ट्राचे युवा नेते श्री. विशाल प्रभाकर परब यांनी केले. तळवणे थंडर क्रिकेट क्लब व नवयुवक नाट्य संपदा, तळवणे यांच्या…
कुडाळमध्ये मुंबई विद्यापीठाचे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र सुरू करण्याची मागणी
नगरसेवक मंदार शिरसाट यांनी घेतली प्र-कुलगुरू प्रा. अजय भामरे यांची भेट कुडाळ:सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ग्रामीण भागातील गुणवंत विद्यार्थ्यांना MPSC, UPSC आणि इतर केंद्रीय व राज्यस्तरीय स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी हक्काचे व्यासपीठ मिळावे आणि कुडाळमधून भविष्यातील ‘क्लास १’ (Class 1) अधिकारी घडावेत, या उद्देशाने युवासेना जिल्हाप्रमुख व माजी उपनगराध्यक्ष मंदार श्रीकृष्ण शिरसाट यांनी एक महत्त्वाचे व सकारात्मक पाऊल…
कणकवली रेल्वे स्थानकावरील प्रवाशांसाठीच्या निवारा शेडचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते उद्घाटन
सिंधुदुर्ग:कणकवली रेल्वे स्थानकावरील प्लॅटफॉर्म क्रमांक २ वर प्रवाशांसाठी उभारण्यात आलेल्या शेडचे उद्घाटन पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते करण्यात आले. प्रवासी संघटना आणि नागरिकांकडून गेल्या अनेक वर्षांपासून या शेडची मागणी केली जात होती. रेल्वे प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावा केल्यानंतर ही मागणी पूर्ण झाली आहे. तसेच ज्येष्ठ नागरिक आणि प्रवाशांच्या सोयीसाठी रेल्वे स्थानकावर लिफ्ट सुविधेच्या कामाचे भूमिपूजनही यावेळी…
त्रिपुरारी पौर्णिमेच्या चांदण्यात रगणार ‘हे चांदणे फुलांनी…’ या हिंदी-मराठी सदाबहार गीतांच्या विशेष संगीत मैफलीचे आयोजन
सावंतवाडी:त्रिपुरारी पौर्णिमेच्या प्रसन्न चांदण्यात सुरांच्या मधुर लहरींनी आसमंत भारून टाकण्याची संगीतमय पर्वणी सावंतवाडीकरांना अनुभवायला मिळणार आहे. श्री सद्गुरू संगीत, कला व सांस्कृतिक मंडळ आणि सावंतवाडी नगरपरिषद यांच्या संयुक्त विद्यमाने ‘हे चांदणे फुलांनी…’ या हिंदी-मराठी सदाबहार गीतांच्या विशेष संगीत मैफलीचे आयोजन करण्यात आले आहे. या संगीत सोहळ्याचे हे सातवे वर्ष असून, मंगळवार, दिनांक २४ नोव्हेंबर २०२६…
कणकवलीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने शायना एनसीच्या फोटोला जोडे मारून केला निषेध
कणकवली:शिंदे शिवसेनेची राष्ट्रीय प्रवक्ती शायना एनसी हिने बाळासाहेबांचा फोटो फाडल्याच्या निषेधार्थ आज महिला जिल्हाप्रमुख नीलम पालव यांच्या नेतृत्वाखाली कणकवली तालुका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने शिवसेना शाखा येथे शायना एनसीच्या फोटोला “जोडे मारो” आंदोलन केले. याप्रसंगी बाळासाहेबांचा अपमान करणाऱ्या शायना एनसीला पाठीशी घालणाऱ्या शिंदे गटाचा निषेध असो! शायना एनसी हाय हाय! शायना एनसी मुर्दाबाद! शायना…
कलंबिस्त रायवाडी येथील काशिबाई सावंत यांचे वृद्धापकाळाने निधन
सावंतवाडी:कलंबिस्त रायवाडी येथील रहिवासी गं,भा ,काशीबाई कृष्णा सावंत वय ८९ वर्ष हिचे आज राहत्या घरी वृद्धापकाळाने दुःखद निधन झालेकाशीबाई कृष्णा सावंत हिच्या निधनाने सावंत कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे .तिच्या पश्चात मुलगा, मुली ,नातवंडे, नातूसून,पुतणे ,पतवंडे, असा मोठा परिवार आहे .कुलाबा वेधशाळेतील मुंबई येथील निवृत्त कर्मचारी भास्कर सावंत यांच्या त्या मातोश्री तर ज्येष्ठ पत्रकार सिताराम…
भारत पर्वच्या राष्ट्रीय व्यासपीठावर कोकणची ‘ वृषाली;
वृषाली रेडकर यांच्याकडे महाराष्ट्राच्या प्रतिनिधित्वाची धुरा सावंतवाडी:डिजिटल माध्यमातून कोकणची संस्कृती, परंपरा आणि पर्यटन वैभवाची ओळख व्यापक स्तरावर पोहोचविणाऱ्या सावंतवाडी तालुक्यातील मळगाव गावच्या रहिवासी सौ. वृषाली सुधाकर रेडकर (कोकणची Russhali) यांना भारत सरकारच्या पर्यटन मंत्रालयातर्फे आयोजित ‘भारत पर्व २०२६’ या राष्ट्रीय सांस्कृतिक महोत्सवात महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली. देशभरातील निवडक डिजिटल कंटेंट क्रिएटर्समध्ये त्यांची झालेली निवड…
सिंधुदुर्गच्या विकासाला नवे पंख; चिपी-मुंबई विमानसेवेच्या उड्डाणाचा झाला शानदार शुभारंभ
पालकमंत्री नितेश राणे यांचे आवाहन… माजी मुख्यमंत्री खास नारायण राणेंचे स्वप्न पूर्ण… सिंधुदुर्ग:सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या पर्यटन विकासाला नवी दिशा देणारी आणि जिल्हावासीयांसाठी दळणवळणाची महत्त्वपूर्ण सुविधा ठरणारी सिंधुदुर्ग-मुंबई विमानसेवा दोन वर्षांच्या प्रदीर्घ खंडानंतर आज पुन्हा सुरू झाली. या विमानसेवेच्या शुभारंभानिमित्त चिपी येथील सिंधुदुर्ग विमानतळावर ढोल-ताशांच्या गजरात मुंबईहून आलेल्या प्रवाशांचे औक्षण करून पुष्प व मिठाई देऊन उत्साहात स्वागत…





3yiyzk