शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब यांचा उबाठाला जोरदार धक्का…

आंबोली
आंबोली जिल्हा परिषद गट व विलवडे पंचायत समिती गणातील उबाठाचे प्रमुख नेते सोनू दळवी यांनी आपल्या शेकडो कार्यकर्त्यांसह शिवसेनेत जाहीर प्रवेश केल्याने उबाठाला मोठा राजकीय धक्का बसला आहे. हा प्रवेश सोहळा शिवसेना जिल्हाप्रमुख श्री. संजू परब यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला.विलवडे, कोनशी, सरमळे तसेच परिसरातील अन्य गावांमधील कार्यकर्त्यांनी शिवसेनेची विचारधारा व नेतृत्वावर विश्वास व्यक्त करत पक्षात प्रवेश केला. या प्रवेशामुळे परिसरातील शिवसेनेची संघटनात्मक ताकद लक्षणीयरीत्या वाढली आहे.यावेळी व्यासपीठावर शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब यांच्यासमवेत तालुकाप्रमुख दिनेश गावडे, राघोजी सावंत, सातुली सरपंच सोनाली परब, देवसू गावचे मानकरी मंताजी सावंत, पारपोली सरपंच संदेश गुरव यांच्यासह अनेक पदाधिकारी व मान्यवर उपस्थित होते.प्रवेशप्रसंगी बोलताना संजू परब यांनी नव्याने प्रवेश केलेल्या कार्यकर्त्यांचे स्वागत करत, शिवसेना सर्वसामान्यांच्या प्रश्नांसाठी सदैव रस्त्यावर लढणारा पक्ष असल्याचे सांगितले. आगामी काळात संघटना अधिक मजबूत करून जनतेच्या विकासासाठी काम करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top