महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून सुनेत्रा पवार यांनी घेतली शपथ!

मुंबई :
सुनेत्रा पवार यांनी महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आहे. राजभवनात पार पडलेल्या शपथविधी सोहळ्यात राज्यपालांनी त्यांना पदाची शपथ दिली. यासह महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदाच एका महिलेला उपमुख्यमंत्रीपदाचा मान मिळाला असून, या घटनेमुळे राज्याच्या राजकारणात नवा अध्याय सुरू झाल्याचं चित्र आहे.अजित पवार यांच्या आकस्मिक निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नेतृत्वाबाबत मोठी चर्चा सुरू होती. नवे गटनेते कोण असतील आणि उपमुख्यमंत्रीपदाची जबाबदारी कोणाकडे जाणार, याबाबत राजकीय वर्तुळात अनेक तर्कवितर्क लावले जात होते. अखेर या सर्व चर्चांना पूर्णविराम देत सुनेत्रा पवार यांचं नाव निश्चित झालं आणि त्यांनी अधिकृतपणे उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली.राजभवनात पार पडलेल्या या शपथविधी सोहळ्याला राष्ट्रवादी काँग्रेसचे वरिष्ठ नेते, आमदार आणि अनेक मान्यवर उपस्थित होते. महाराष्ट्राच्या राजकारणात महिलांच्या नेतृत्वाचा नवा अध्याय सुरू झाल्याची भावना या वेळी व्यक्त होत होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top