नवी मुंबईत प्रा. रूपेश पाटील यांची तोफ धडाडणार!,शिवरायांचे अनेक पैलू उलगडणार!

केदार सहकारी गृहनिर्माण संस्थेत शिवजयंतीनिमित्त शिवचरित्राचा जागर!

सावंतवाडी
महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध प्रेरणादायी वक्ते तथा शिव व्याख्याते प्रा. रुपेश पाटील यांचे१९ फेब्रुवारी रोजी शिवजयंतीनिमित्त ‘शिवराय डोक्यावर नव्हे डोक्यात घ्यायला शिका!’ या विषयावर धगधगते व्याख्यान होणार आहे.

केदार सहकारी गृहनिर्माण संस्था (मर्यादित) व केदार सोसायटी सोशल असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने शिवजयंती उत्सव २०२६ मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. हा कार्यक्रम शुक्रवार, १९ फेब्रुवारी २०२६ रोजी आयोजित करण्यात आला असून सर्व केदार रहिवाशांना उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.
कार्यक्रमाची सुरुवात सकाळी ९.०० वाजता शिवज्योत आगमन सोहळ्याने (पल्सर उड्डाण विमानतळ चौक ते केदार सोसायटी कार्यालय) होईल. सकाळी १०.०० ते ११.०० या वेळेत छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन व शिवज्योत पूजन करण्यात येणार आहे. त्यानंतर सकाळी १०.०० ते दुपारी २.०० या वेळेत रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले आहे.

सायंकाळी ४.०० ते ६.०० दरम्यान भव्य मिरवणूक काढण्यात येईल. सायंकाळी ६.०० ते ८.०० या वेळेत सांस्कृतिक कार्यक्रम (विषय – छत्रपती शिवाजी महाराज आणि गडकिल्ले) सादर करण्यात येतील.

दरम्यान रात्री ८.०० ते १०.०० या वेळेत सावंतवाडी (जि. सिंधुदुर्ग) येथील सुप्रसिद्ध शिवव्याख्याते प्रा. रुपेश पाटील यांचे ‘शिवराय डोक्यावर नको डोक्यात घ्यायला शिका!’ या विषयावर व्याख्यान होणार आहे.

सदर कार्यक्रम प्लॉट क्रमांक ८, सेक्टर २९, तळोजा फेज-२, ता. पनवेल, जि. रायगड, नवी मुंबई हयेथे होणार असून या उत्सवाला परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top