आकाशदर्शन’ कार्यक्रमाला खगोलप्रेमींचा उत्स्फूर्त प्रतिसाद :विद्यार्थी आणि पालकांनी अनुभवले आकाशदर्शन..
कुडाळ:
राजकीय माणसासाठी सामाजिक बांधिलकी महत्वाची असते. ‘चला कुडाळ घडवूया’ या उपक्रमातून मंदार शिरसाट यांनी सामाजिक बांधिलकी जपली आहे. त्यांनी जे उपक्रम राबविले आहेत ते कौतुकास्पद आहेत, असे प्रतिपादन माहीमचे आमदार महेश सावंत यांनी केले. नगरसेवक मंदार शिरसाट यांनी ‘चला कुडाळ घडवूया’ या उपक्रमांतर्गत येथील बॅरिस्टर नाथ पै विद्यालयाच्या पटांगणात शनिवारी सायंकाळी उशिरा ‘आकाश दर्शन व खगोलशास्त्र करियर संधी’ या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमाच्या उदघाटन प्रसंगी आमदार महेश सावंत बोलत होते. खगोल तज्ज्ञ तथा विज्ञान पत्रकार मयुरेश प्रभुणे आणि त्यांच्या टीमने यावेळी विद्यार्थी आणि पालकांना आकाशदर्शन घडविले.
