एस.एस.सी. परीक्षेत शिरशिंगे पावणाई रवळनाथ विद्यामंदिरचा १०० टक्के निकाल..

सावंतवाडी:
शिरशिंगे पावणाई रवळनाथ विद्यामंदिर, शिरशिंगे या शाळेने यंदाच्या एस.एस.सी. परीक्षेत आपल्या यशाचा झेंडा फडकवत १०० टक्के निकालाची गौरवशाली परंपरा कायम राखली आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी शैक्षणिक गुणवत्तेत घेतलेली ही उंच झेप उल्लेखनीय ठरली आहे.

या परीक्षेत श्रेयस शंकर शिर्के याने ८६.८० टक्के गुणांसह शाळेत प्रथम येण्याचा बहुमान मिळवला. त्याला एकूण ४३४ गुण प्राप्त झाले आहेत. तसेच सुशांत सुधाकर राऊळ याने ७२.८० टक्के (३६४ गुण) मिळवून द्वितीय क्रमांक पटकावला, तर ओजस संदिप निकम याने ७१.८० टक्के (३५९ गुण) मिळवून तृतीय क्रमांक प्राप्त केला.

विद्यालयाच्या या शंभर नंबरी यशामुळे शिरशिंगे परिसरात आनंदाचे वातावरण असून, सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे आणि त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांचे सर्व स्तरांतून हार्दिक अभिनंदन करण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top