कुडाळ प्रतिनिधी
कुडाळ-मालवण विधानसभा मतदारसघाच आमदार निलेश राणे यांनी आज मतदारसंघाच्या झंझावाती दौऱ्यावर असताना विविध विकासकामांचा धडाका लावला. पाणीपुरवठा, पर्यटन, वीज, दळणवळण आणि शैक्षणिक सुविधा अशा एकूण ९ महत्त्वपूर्ण कामांचा शुभारंभ आणि भूमिपूजन आमदार राणे यांच्या उपस्थितीत करण्यात आले. या विकासकामांच्या माध्यमातून स्थानिक जनतेच्या मूलभूत प्रश्नांना न्याय मिळणार असून मतदारसंघाच्या वैभवात भर पडणार आहे.
नेरुरमध्ये जलशुद्धीकरण प्रकल्पाचे शुभारंभ..
आमदार राणे यांच्या या दौऱ्याची सुरुवात सकाळी १० वाजता नेरुर येथील ऐतिहासिक कलेश्वर मंदिराच्या परिसरात झाली. यावेळी नेरुर परिसरासाठी अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या ‘जलशुद्धीकरण प्रकल्पाचे’ शुभारंभत्यांच्या उपस्थितीत करण्यात आले. या प्रकल्पामुळे नेरुरमधील ग्रामस्थांना आता कायमस्वरूपी शुद्ध पिण्याचे पाणी उपलब्ध होणार असून, अनेक वर्षांची पाण्याची समस्या सुटली आहे.
| वालावल तलावाचे होणार सुशोभीकरण..
निसर्गरम्य पर्यटन स्थळ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वालावल येथील तलावाच्या सुशोभीकरण कामाचे भूमिपूजनही यावेळी करण्यात आले.
वालावल तलावाचे सौंदर्य वाढवून पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी विशेष निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. या कामामुळे स्थानिक पर्यटनाला मोठी चालना मिळणार आहे.
