जनसेवा हीच ईश्वरसेवा या विचाराला कृतीची जोड देत

भाजप युवा नेते विशाल परब यांची जनसेवा ठरतेय प्रेरणादायी; पावसाळ्यात मोफत छत्री वाटप उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद

सावंतवाडी प्रतिनिधी:
भारतीय जनता पार्टीचे युवा नेते विशालजी परब यांनी सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात सामाजिक बांधिलकी जपत विविध जनहिताचे उपक्रम राबविले आहेत.

समाजातील गरजू, वंचित आणि संकटग्रस्त घटकांच्या मदतीसाठी कायम तत्पर असलेल्या विशाल परब यांच्या कार्याची सर्व स्तरांतून प्रशंसा होत आहे.

गेल्या अनेक वर्षांपासून सामाजिक, शैक्षणिक, धार्मिक आणि क्रीडा क्षेत्रात सातत्याने योगदान देत त्यांनी जनतेच्या मनात विश्वासाचे स्थान निर्माण केले आहे. विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत, गरजू कुटुंबांना आधार, युवकांना प्रोत्साहन तसेच नागरिकांच्या विविध समस्या सोडविण्यासाठी प्रशासनाकडे पाठपुरावा करण्याचे कार्य त्यांनी सातत्याने केले आहे.

याच जनहिताच्या भूमिकेतून पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टी आणि विशाल परब यांच्या माध्यमातून सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात मोफत छत्री वाटप उपक्रम राबविण्यात येत आहे. हा उपक्रम केवळ वस्तू वाटपापुरता मर्यादित नसून समाजातील गरजू घटकांप्रती असलेल्या संवेदनशीलतेचा आणि सामाजिक बांधिलकीचा प्रत्यय देणारा आहे.

विशाल परब यांचे कार्य अनेक युवकांसाठी प्रेरणादायी ठरत असून प्रसिद्धीपेक्षा जनतेच्या सेवेला प्राधान्य देणारे नेतृत्व म्हणून त्यांची ओळख निर्माण झाली आहे. सत्ता किंवा पदाची अपेक्षा न ठेवता समाजहिताचा ध्यास घेऊन कार्य करणाऱ्या या युवा नेतृत्वाला विविध मान्यवर आणि कार्यकर्त्यांनी मानाचा मुजरा अर्पण केला आहे.

यावेळी सावंतवाडी उपनगराध्यक्ष अँड अनिलजी निरवडेकर, शहराध्यक्ष निलेश नाटेकर, उपसरपंच रत्नाकर आगलावे, बूथ अध्यक्ष राकेश केसरकर, गुरु कल्याणकर, दादू कविटकर, बाळा आकेरकर, सिद्धेश महाजन, हेमंत दाभोलकर, जिल्हा परिषद सदस्य नितीन राऊळ, सदा राणे, प्रवीण पंडित, निलेश पटेकर, बाळा पेडणेकर, स्मिता पेडणेकर, बाबा काणेकर, मनोज कल्याणकर, बापू कदम आदींनी विशाल परब यांच्या कार्याचे कौतुक केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top