सैनिक स्कूल प्रवेश परीक्षेसाठी ऑनलाइन मार्गदर्शन वर्ग….

इयत्ता ५ वीच्या विद्यार्थ्यांसाठी सुवर्णसंधी; AISSEE परीक्षेची सर्वंकष तयारी….

सावंतवाडी:
यशवंतराव भोसले इंटरनॅशनल स्कूल, सावंतवाडी यांच्या वतीने इयत्ता ५ वीच्या विद्यार्थ्यांसाठी ऑल इंडिया सैनिक स्कूल प्रवेश परीक्षा (AISSEE) मार्गदर्शन वर्ग सुरू करण्यात आले आहेत. विद्यार्थ्यांना सैनिक स्कूल प्रवेश परीक्षेत यश मिळवून देण्याच्या उद्देशाने हा सहा महिन्यांचा विशेष ऑनलाइन मार्गदर्शन कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.

या वर्गामध्ये अनुभवी शिक्षकांचे मार्गदर्शन, नियमित अध्यापन, सराव परीक्षा, मूल्यमापन तसेच शंका समाधान सत्रांची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. याशिवाय परीक्षेसाठी आवश्यक स्टडी मटेरियलही अधिकृत अभ्यासक्रमानुसार विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिले जाणार आहे.

या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये शिस्त, नेतृत्वगुण, आत्मविश्वास आणि राष्ट्रसेवेची भावना विकसित होण्यास मदत होणार असून सैनिक स्कूलमध्ये प्रवेशाचे स्वप्न साकार करण्यासाठी हा मार्गदर्शन वर्ग उपयुक्त ठरणार आहे. प्रवेश व अधिक माहितीसाठी ९४२२३८६६१४ किंवा ९९२०६७५६१ या क्रमांकांवर संपर्क साधावा असे आवाहन शाळेतर्फे करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top