कबूलयतदार शेतकऱ्यांसाठी “फार्मर आयडीची” अट शिथिल करा

शशिकांत गावडे यांची महसूलमंत्री श्री.बावनकुळे यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी

सावंतवाडी प्रतिनिधी
आंबोली, चौकूळ, गेळे तील कबूलयतदार जमिनीवरील शेती करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी खास बाब म्हणून फार्मर आयडी ची अट शिथिल करण्याची मागणी महसूल मंत्री श्री बावनकुळे व पालकमंत्री श्री नितेश राणे यांच्या कडे मागणी केली आहे

आंबोली, चौकूळ, गेळे तील कबूलयतदार जमिनीवरील शेती करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी खास बाब म्हणून फार्मर आयडी ची अट शिथिल करण्याची मागणी महसूल मंत्री श्री बावनकुळे व पालकमंत्री श्री नितेश राणे यांच्या कडे आंबोली प्रमुख गावकर तथा आंबोली विकास सोसायटी चेअरमन श्री शशिकांत सोनू गावडे यांनी निवेदन द्वारे केली. या वेळी महसूल मंत्री श्री बावनकुळे यांनी या बाबत नक्कीच योग्य ती कार्यवाही करणार तसेच आंबोली चा कबूलयतदार प्रश्न पण येत्या 12 तारीख ला वन मंत्री श्री गणेश नाईक व स्वतः महसूल मंत्री श्री बावनकुळे साहेब व पालकमंत्री, स्थानिक आमदार यांच्या उपस्थिती मध्ये संयुक्त बैठक आयोजित करून सदर प्रश्न कायमचा मार्गी लावण्यासाठी कार्यवाही करणार असल्याचे सांगितले.
पालकमंत्री श्री नितेश राणे यांनी सदर प्रश्न लवकर सुटवा या साठी पाठपुरवठा करणार असल्याचे सांगितले.
या वेळी आंबोली प्रमुख गावकर तथा आंबोली विकास सोसायटी चेअरमन श्री शशिकांत सोनू गावडे, आंबोली सोसायटी श्री महादेव गावडे, आंबोली सोसायटी संचालक, श्री संतोष पालेकर व इतर आंबोली ग्रामस्थ उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top