निळेली पशुपैदास क्षेत्रातील कारभारावर ग्रामस्थांचा संताप;१५ ऑगस्टला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन…..!

पालकमंत्री नितेश राणे यांनी दिले कारवाईचे आदेश…

कुडाळ:
माणगाव खोऱ्यातील पशुपैदास केंद्र निळेली येथील अधिकाऱ्यांच्या मनमानी कारभाराविरोधात ग्रामस्थानी आक्रमक भूमिका घेतली , आज १५ ऑगस्ट २०२६ रोजी सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी कार्यालय, ओरोस येथे आंदोलन छेडलं ..

दरम्यान, वरिष्ठ वन अधिकाऱ्यांच्या माध्यमातून करण्यात आलेल्या पाहणीत २ ते ३ एकर क्षेत्रात वृक्षतोड झाल्याचे स्पष्ट झाल्याचा दावा ग्रामस्थांनी केला आहे. निळेली पशुपैदास क्षेत्राचे सुमारे ५०० एकर शासकीय क्षेत्र असल्याचे सांगत, संपूर्ण क्षेत्राची पाहणी केल्यास शासनाच्या महसुलाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याची शक्यता असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

या सर्व प्रकरणाची खाते निहाय सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, तसेच कृषी विद्यापीठाने नेमलेल्या समितीच्या भूमिकेचीही चौकशी करावी, अशी मागणी या ग्रामस्थांनी केली या प्रकरणात कृषी विद्यापीठ दापोलीचे कुलगुरू संबंधित अधिकाऱ्यांना पाठीशी घालत असल्याचा संशयही निवेदनातून व्यक्त करण्यात आला आहे. या सर्व बाबी ची सखोल चौकशी करून कारवाई करावी असे आदेश स्वतः पालकमंत्री नितेश राणे यांनी आज इथे दिले आहेत

यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ग्रामस्थ दीपक काणेकर मिलिंद धुरी, विनोद जाधव,नामदेव जानकर, सखाराम गावडे ,नकुल गवंडे,किशोर दळवी,विष्णू राणे वसंत दळवी,आंदोलनकरते हजर होते..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top