प्रधानमंत्री जनमन योजनेअंतर्गत करंजे येथे आदिवासी बांधवांच्या घरकुलांचा गृहप्रवेश सोहळा संपन्न
पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते लाभार्थ्यांना घरांच्या चाव्यांचे वितरण सिंधुदुर्गनगरी:प्रधानमंत्री जन मन आवास योजनेअंतर्गत करंजे ग्रामपंचायत क्षेत्रातील आदिवासी बांधवांसाठी बांधण्यात आलेल्या घरकुलांचा गृहप्रवेश सोहळा पालकमंत्री नितेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत उत्साहात संपन्न झाला. यावेळी लाभार्थ्यांना नव्याने बांधण्यात आलेल्या घरांच्या चाव्यांचे वितरण करण्यात आले. याप्रसंगी पालकमंत्री श्री. राणे म्हणाले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्य शासन…
