दुकानवाड येथील आत्माराम म्हाडगुत यांचे आकस्मित निधन
कुडाळ: कै.आत्माराम सिताराम तथा आबा म्हाडगुत यांच वयाच्या ८३ व्या वर्षी झालेल आकस्मिक निधन मनाला चटका आणि वेदना लावून जाणारे आहे. दुकानवाड पंचक्रोशीतील एक अजातशत्रू व्यक्तिमत्व म्हणजे आबा म्हाडगुत.आबा म्हणजे तीन पिढ्यांचे साक्षीदार. स्वातंत्र्यपूर्व काळापासून आत्तापर्यंत पंचक्रोशीत घडलेल्या सर्व घटनांचे मौखिक पुरावे ऐकावेत ते आबांच्या वाणीतून. दिवसभरात कोण व्यक्ती कुणीकडे गेली याची माहिती हवी असेल…
