पीसीपीएनडीटी कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करा:जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे
सिंधुदुर्गनगरी:जिल्ह्यात गर्भलिंग निदानास प्रतिबंध घालण्यासाठी पीसीपीएनडीटी कायद्याची प्रभावी आणि कठोर अंमलबजावणी करण्यात यावी, तसेच जिल्ह्यातील सोनोग्राफी व गर्भपात केंद्रांची नियमित तपासणी करून नोंदींची काटेकोर पडताळणी करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी दिले. भ्रूणहत्या रोखण्यासाठी आणि मुलींच्या जन्मदरात सकारात्मक वाढ घडवून आणण्यासाठी आरोग्य विभागाने व्यापक जनजागृती मोहिम राबवावी, असेही त्यांनी स्पष्ट केले. जिल्हास्तरीय पीसीपीएनडीटी समितीची…
