सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी बेवारस तरुणाला दिले जीवदान.
सावंतवाडी:सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठान ही संस्था कुठचीही अपेक्षा न बाळगता निस्वार्थपणे शहरांमध्ये एक संजीवनी म्हणून काम करत आहे.संकटात दुःखात आणि वेदनेत असलेला माणूस तरला पाहिजे हे या संस्थेचे प्रमुख ध्येय आहे. आज पर्यंत अनेक निराधारांना त्यांनी आधार दिला आहे. कालची घटनाविठ्ठल मंदिरच्या समोर दोन्ही हात जमिनीला टेकून घष्टत चाललेला एक तरुण ज्याच्या दोन्ही पायांना मोठ्या जखमा…
