पत्रकारांच्या पाल्यांना शैक्षणिक किटचे वितरण
VOM इंटरनॅशनल फोरम, कोकण कला व शिक्षण संस्थेचे विशेष सहकार्य.
सावंतवाडी प्रतिनिधी
जगभरातील पत्रकारांना एकत्र आणणाऱ्या व्हॉईस ऑफ मीडिया संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संदीप काळे हे देशाला नव्हे तर संपूर्ण जगाला विधायक पत्रकारिता कशी असावी?, याचा आदर्श परिपाठ देणारे व्यक्तिमत्व आहेत. त्यांच्या प्रेरणेमुळे आज जगभरात प्रचंड जाळे असलेल्या ‘व्हॉईस ऑफ मीडिया’ संघटनेच्या विविध उपक्रमांचा नक्कीच सार्थ अभिमान वाटतो, असे गौरवोद्गार सावंतवाडीचे माजी नगराध्यक्ष तथा शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख सच्चिदांनंद उर्फ संजू परब यांनी येथे व्यक्त केले.
