पालकमंत्री नितेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त कुडाळ मंडलच्या वतीने तुळसुली येथे गोसेवा कार्यक्रमांचे आयोजन..

कुडाळ:
पालकमंत्री सन्मा.नितेशजी राणेसाहेब यांनी यावर्षी आपला वाढदिवस गोसेवा करून साजरा करा अशा सूचना दिल्या होत्या.
त्या पार्श्वभूमीवर कुडाळ मंडलच्या वतीने उद्या दिनांक 23 जून रोजी श्रीकृष्ण आनंदवन गोशाळा, तुळसुली येथे गोसेवा कार्यक्रम आयोजित केला होता
या गोशाळेमध्ये 85 भाकड गाई आहेत, त्यांच्या चाऱ्याच्या व संगोपनासाठी भारतीय जनता पार्टीकडून रुपये 31,000/ ची आर्थिक मदत श्रीकृष्ण गोशाळेचे संचालक श्री. आनंद वारंग व सहकाऱ्याकडे सुपूर्द करण्यात आली.
या कार्यक्रमाला भाजपा जिल्हा अध्यक्ष श्री. प्रभाकर सावंत, जिल्हा सरचिटणीस श्री. रणजित देसाई, जिल्हा उपाध्यक्ष श्री. बंडया सावंत, सौ. संध्या तेर्से मॅडम, जेष्ठ नेते श्री. राजू राऊळ, मंडल अध्यक्ष श्री. संजय वेंगुर्लेकर, महिला मोर्चा अध्यक्ष सौ. आरती पाटील, मंडल उपाध्यक्ष श्री. राजा धुरी, जिल्हा कार्यकारणी सदस्य सौ. आदिती सावंत, श्री. श्रीपाद तवटे, युवा मोर्चा अध्यक्ष श्री. तन्मय वालावलकर, शहर अध्यक्ष सुनिल बांदेकर, मंडल उपाध्यक्ष श्री. विजय वारंग, माजी सभापती सौ. प्रतिभा घावनलकर, पंचायत समिती सदस्या अर्चना घावनळकर तसेच इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
गोशाळेचे संचालक आनंद वारंग यांनी उपस्थितांचे आभार मानून पालकमंत्री श्री. नितेशजी राणेसाहेब यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top