सावंतवाडी:
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा श्री कलेश्वर विद्यामंदिर, वेत्ये शाळेच्या मुख्याध्यापिका शीतल गावित या ३० जून २०२६ रोजी प्रदीर्घ व समर्पित शैक्षणिक सेवेनंतर सेवानिवृत्त झाल्या. त्यांच्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत शाळा, पालक, शिक्षकवर्ग व ग्रामपंचायतीच्या संयुक्त विद्यमाने त्यांचा सेवापूर्ती सन्मान सोहळा सन्मानपूर्वक वातावरणात पार पडला.
