पशु पैदास श्रेत्र निळेली येथील अधिकाऱ्यांच्या तत्काळ बदली करा..


आंतरराष्ट्रीय मानवाधिकार वेल्फेअर असोसिएशन सिंधुदुर्ग च्या वतीने कुलगुरूंना निवेदनाद्वारे मागणी…

कुडाळ निळेली:
तालुक्यातील पशुपैदास क्षेत्रातील दोन अधिकाऱ्यांची तत्काळ बदली करण्यात यावी.’आंतरराष्ट्रीय मानवाधिकार वेल्फेअर असोसिएशन सिंधुदुर्ग च्या (IHRWA) वतीने कुलगुरू डॉ.संजय भावे यांच्याकडे निवेदनाद्वारे असोसिएशनच्या महिला जिल्हाध्यक्ष सौ. मानसी परब आणि महिला जिल्हासचिव सौ. संजना सावंत यांनी केली आहे.

​एकाच जागी प्रदीर्घ सेवा आणि मनमानी कारभार
​कुशल पशुवैद्यकीय अधिकारी व प्रभारी अधीक्षक श्री.विष्णू सखाराम कवीटकर हे गेल्या ३० वर्षांपासून, तर कृषी सहाय्यक श्री. उमेश कृष्णा पायशेट हे गेल्या १८ वर्षांपासून एकाच कार्यालयात कार्यरत आहेत. शासकीय नियमांची पायमल्ली करून हे अधिकारी एकाच ठिकाणी टिकून आहेत आणि मनमानी कारभार करत आहेत, असा थेट आरोप निवेदनातून करण्यात आला आहे.

​ गेली ३० आणि १८ वर्षे हे कर्मचारी कोणत्या नियमाखाली एकाच कार्यालयात सेवा बजावत आहेत, याचा स्पष्ट खुलासा विद्यापीठाने करावा.
या प्रदीर्घ कालावधीत परिसरातील व गावातील शेतकऱ्यांना या अधिकाऱ्यांकडून कोणताही फायदा झालेला नाही. तसेच कोणतेही प्रशिक्षण कार्यक्रम अथवा सुधारणा राबवल्या गेल्या नाहीत. महाराष्ट्र शासनाच्या धोरणानुसार ५ वर्षांपेक्षा जास्त सेवा झाल्यावर बदली होते. विशेष परिस्थितीत मुदतवाढ दिली असली, तरी ती कोणाच्या आदेशाने व कोणत्या कारणास्तव दिली, याचा लेखी खुलासा व्हावा.
​वरिष्ठ पातळीवर तक्रार
​शासकीय धोरण व नियमांचे उल्लंघन करून चाललेल्या या कारभाराची दखल घ्यावी आणि संबंधित दोन्ही कर्मचाऱ्यांची तत्काळ नियमानुसार बदली करावी, अशी विनंती आंतरराष्ट्रीय मानवाधिकार वेल्फेअर असोसिएशनने केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top